Buldhana Samruddhi Highway  Saam v
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर नियमांची पायमल्ली; धक्कादायक VIDEO आला समोर

Buldhana Samruddhi Highway News : अज्ञात बाईकस्वार हा जालना ते वाशिम दरम्यान भरधाव वेगाने बाईक समृद्धी महामार्गावर चालवत होता.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून शेकडो अपघात या महामार्गावर झाले आहे. या अपघातांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नियमांचं पालन होत नसल्याने अनेक अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांकडून अनेक प्रकारे जनजागृती केली जात आहे. मात्र नागरिक विविध प्रकारे नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत.

समृद्धी महामार्गावरील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. अज्ञात बाईकस्वार हा जालना ते वाशिम दरम्यान भरधाव वेगाने बाईक समृद्धी महामार्गावर चालवत होता.

नागपूरकडे जात असताना या बाईकस्वाराला सिंदखेडराजा एक्झिटजवळ पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता तो न थांबता नागपूरच्या दिशेने निघाला आहे. (Latest News Update)

समृद्धी महामार्गावर बाईक चालवण्यास मनाई असताना या बाईकस्वाराने बाईक इथे चालवली. महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकाने या बाईकस्वाराचा व्हिडीओ शूट केला आहे. यावर पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे आज दुपारी दरे गावात जाणार

Nashik Crime : हाणामारीत जखमी राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार

Oil India Recruitment: ऑइल इंडियामध्ये सरकारी नोकरीची संधी अन् १.६० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Video Viral: मुंबईकर धन्यवाद!, कामाला जाणाऱ्या तरूणाचं 'ते' कृत्य पाहून मराठा आंदोलनकांनी केलं तोंडभरून कौतुक, VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates : अजित पवारांच्या विश्वासू शिलेदारांचा जरांगेंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा

SCROLL FOR NEXT