Potholes On Samruddhi Mahamarg : अपघातांची मालिका सुरुच... समृद्धी महामार्गावरील खड्डे कधी बुजणार? प्रशासनास सवाल

Buldhana News : छाेट्या छाेट्या खड्ड्यांमुळे अपघात घडताहेत असे वाहनधारकांनी सांगितले.
Samruddhi Mahamarg, Potholes
Samruddhi Mahamarg, Potholessaam tv
Published On

Samruddhi Mahamarg News : आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून आणि 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले आहेत. पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. (Maharashtra News)

Samruddhi Mahamarg, Potholes
MSRTC Bus: शाळा, काॅलेजला न जाता विद्यार्थ्यांनी बससाठी छेडले आंदाेलन, क-हाड तालुक्यातील रणरागिणींनी दाेन तास थांबवल्या एसटी

त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहने अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील विविध मार्गावरील खड्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत होता आता मात्र समृद्धी महामार्गा वरील खड्याचा (potholes) प्रश्न उपस्थित झाला आहे.

Samruddhi Mahamarg, Potholes
MP Dr Jaisiddeshwar Shivacharya Mahaswami : भाजप खासदारांच्या 'त्या' प्रकरणाची ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यात हाेणार सुनावणी

या खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याची तक्रार वाहनधारक करु लागले आहेत. या महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून टाकावेत म्हणजे ख-या अर्थाने त्यास समृद्धी मार्ग (samruddhi mahamarg) म्हणता येईल असेही वाहन धारकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com