Latur News दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur: घरकुल योजनेत श्रीमंत पात्र तर गरीब वंचित; यादी रद्द करून नवीन सर्व्हेची मागणी

जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्याकडे तक्रार

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील अहमदपूर (Ahmedpur) तालुक्यातील धसवाडी गावातील गरीब आणि पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून श्रीमंत लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी केल्याने वंचित लाभार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे तक्रार करत सदरील घरकुल लाभार्थ्यांची यादी रद्द करून नवीन सर्व्हे करावा आणि पात्र लोकांना लाभ घ्यावा अशी मागणी केली आहे.

हे देखील पहा -

धसवाडी गाव हे अहमदपूर तालुक्यातील छोटेसे गाव असून या गावातील गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचा लाभ मिळणे गरजेचे होते पण जिसकी लाठी उसकी भैस या म्हणी नुसार घरकुळाच्या याफीत अनेक श्रीमंत आणि नोकरदार लोकांना समाविष्ट करण्यात आले आहे.

तर गावातील पात्र गोरगरीब लोकांना यातून वगळले असल्याने वंचित पात्र लाभार्थी संतापले असून याबाबत अनेकदा अहमदपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना भेटून तक्रार दिली. पण त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने आज धसवाडी ग्रामस्थ आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्याकडे तक्रार दिली आहे. यादीचा पुन्हा सर्व्हे करून पात्र गोरगरिबांना लाभ घ्यावा अशी मागणी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT