Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: 'लोकशाही आणि न्यायव्यवस्था एकमेकांना पूरक, पण...'; सकाळ-वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात निवृत्त न्यायमूर्ती ठिपसे यांचं मोठं वक्तव्य

43rd anniversary of Sakal: लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचं मोठं वक्तव्य

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर

kolhapur News: सकाळ-कोल्हापूर च्या ४३ व्या वर्धापनदिनाचा दिमाखदार सोहळा आज संपन्न झाला. सकाळ- कोल्हापूर' च्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे आणि अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.'लोकशाही आणि न्यायव्यवस्था एकमेकांना पूरक असून त्या दोन्ही सदृढ होण्यासाठी निर्भिड वातावरणाची आवश्यकता आहे, असं वक्तव्य निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी या कार्यक्रमात केलं. (Latest Marathi News)

आज सायंकाळी कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहा मध्ये वर्धापन दिन सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांप्रसंगी बोलताना निवृत्ती न्यायाधीश अभय ठिपसे म्हणाले, देशामध्ये सामाजिक विषमता, धार्मिक तेढ वाढवली जात आहे. राजकीय पक्षांना न आवडणाऱ्या न्यायाधीशांविरोधात सोशल मिडियावर मोहीम चालवली जाते. अशा काळात न्यायव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. लोकशाही आणि न्यायव्यवस्था एकमेकांना पूरक असून त्या दोन्ही सदृढ होण्यासाठी निर्भिड वातावरणाची आवश्यकता आहे,’’ असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी आज येथे व्यक्त केले.

लोकशाही आणि न्याय व्यवस्था’ या विषयावर एक तास संवाद साधताना ठिपसे यांनी लोकशाहीच्या व्याख्येपासून ते जगभरातील विविध खटल्यांच्या निवाड्यापर्यंतचा आढावा घेतला. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले.

ते म्हणाले, ‘‘कोल्हापुरात ‘सकाळ'ची सुरुवात होऊन ४३ वर्षे झाली. कोल्हापुरात ‘सकाळ' ची सुवर्णमहोत्सवाकडे तर पुण्यात शतकमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. ‘सकाळ'ने सुरुवातीपासूनच बातमी हा पत्रकारितेचा गाभा मानला आणि अलीकडील काळात ‘जर्नालिझम टू पॉझिटीव्ह ॲक्टीव्हिझम' ही भूमिका घेऊन विविध प्रश्नांवर प्रसंगी रस्त्यावरही उतरला. समाजात जे चांगले घडते आहे, त्याला अधिक बळ दिले आणि वाईटावर तेवढ्याच कठोरपणे प्रहार केला. बातम्यांपलीकडे जाऊन विविध नागरी प्रश्नांवर ‘सकाळ'ने लोकचळवळ उभी केली. त्यातूनच कोल्हापूरच्या पंचगंगेबरोबरच राज्यातील इतर आणखी काही नद्यांच्या प्रदूषण मुक्तीपासून ते काश्‍मीरमधील गावांत शाळा उभारण्यापर्यंतची अनेक कामे झाली. ही परंपरा अशीच पुढे निरंतर सुरू राहील.’’

‘सकाळ-कोल्हापूर'चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. वर्धापन दिनानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी सकाळ समूहावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT