Raghunath Patil join BRS: 'बीआरएस' पक्षाची ताकद वाढली; शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केला पक्षप्रवेश

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षात आज प्रवेश केला आहे.
Raghunath Patil join BRS
Raghunath Patil join BRSSaam Tv
Published On

Sangli News: शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षात आज प्रवेश केला आहे. सांगलीच्या साखराळे येथे पाटील यांच्या घरी रघुनाथदादा यांनी के चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

भारत राष्ट्र समिती प्रवेश करताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, 'राज्य व देश पातळीवरील भाजपचे सरकार हे लुटारुंचे सरकार आहे. आजवर त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच केले आहे. के चंद्रशेखरराव हे तेलंगणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीआधी एकरी दहा हजार रुपये देतात. शेतीसाठी मोफत वीज देवून शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत'.

Raghunath Patil join BRS
Uddhav Thackeray-BJP News : कुठल्याही अटी-शर्तींशिवाय उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजपसोबत यायचंय? भाजप आमदाराचा सर्वात मोठा दावा

'आजपर्यंत राज्यातील सरकारला अनेकवेळा शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाविषयी सांगून पाहिले, मात्र हे सरकारला शेतकर्‍यांशी देणेघेणे नाही. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकर्‍यांचे भले व्हावे यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. तसेच 9 ऑगस्टला इस्लामपूर येथे सुमारे 50 हजार शेतकर्‍यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेवून या बाबतची भुमिका स्पष्ट केली जाईल, असे रघुनाथ पाटील पुढे म्हणाले.

Raghunath Patil join BRS
K Chandrasekhar Rao : अण्णा भाऊ साठेंचा देशात उचित गाैरव झाला नाही : मुख्यमंत्र्यांची खंत (पाहा व्हिडिओ)

आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर; के चंद्रशेखर राव यांचा दावा

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी आले. यावेळी के चंद्रशेखर राव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. के चंद्रशेखर राव म्हणाले, 'शरद पवार आम्हाला भारतीय जनता पार्टीची बी टीम समजत होते. आज त्यांच्या पक्षाची काय स्थिती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात शिवसेना फुटली , राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे'.

'आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात जरी केली असली तरीही शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन आहे. काँग्रेसने 50 वर्ष तर भाजपने दहा वर्षे सत्ता भोगली पण लोकांच्या पदरी निराशा आलेली आहे. आमच्या कामाची पद्धत बघून अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधलेला आहे, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com