rethare budruk grampanchayat election saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election News : ३५ वर्षांत जे क-हाडात घडलं नाही ते डॉ. अतुल भोसलेंनी घडवून आणलं, पृथ्वीराज चव्हाण गटास माेठा धक्का

आमदार पृथ्वीराज चव्हाण गटात निराशेचे चित्र दिसून येत आहे.

संभाजी थोरात

Karad Political News : कराड तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीत (rethare budruk grampanchayat election) गत ३५ वर्षांत एकाच वेळी सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ही किमया भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांनी साधली. त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला चपराक दिल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. (Maharashtra News)

रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या जागरुक व संवेदनशील समजले जाते. या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरु झाली आहे. सरपंचपदासह १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण ९२ जणांनी अर्ज दाखल केले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या ग्रामपंचायत निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी भोसले गटाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधी गटाने सुरु केले होते. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी भोसले गटाने ७ जागा बिनविरोध निवडून आणत, विरोधकांच्या प्रयत्नांना जबर खीळ घातली आहे आणि या निवडणुकीत यशस्वी आघाडी घेतली आहे.

सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीचे विठ्ठल वॉर्डमधून शरद नामदेव धर्मे, मारुती वॉर्डमधून रुक्साना गुलाब मुल्ला, शिवनगर वॉर्डमधून संग्राम दिलीप पवार, संगीता शिवाजी सावंत, सचिन अरुण जाधव, लक्ष्मी वॉर्डमधून शर्मिला संतोष मोहिते, भाग्यश्री रोहित पवार अशा एकूण ७ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

शिवनगर वॉर्डमधील सर्वच जागांवर सत्ताधारी भोसले गटाचे समर्थक निवडून आले आहेत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

Arranged Marriage Communication: लग्नाआधी होणाऱ्या जोडादारासोबत फोनवर काय बोलावे?

एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, शिवीगाळ अन् अश्लील हातवारे; दोन तरुणींच्या गटात जोरदार हाणामारी,VIDEO

Maharashtra Live News Update : धुळ्यातील विद्यार्थिनी होणार 'आत्मनिर्भर' जिल्हा प्रशासनाकडून 'वीरांगना' स्व-संरक्षण प्रशिक्षण सुरू

Indian Railway : वंदे भारत, नमो भारत की अमृत भारत? काय असतात सुविधा, सर्वात भारी कोणती ट्रेन?

SCROLL FOR NEXT