ganesh idol
ganesh idol 
महाराष्ट्र

काेल्हापूरवासियांनाे! बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालात? हे वाचा

संभाजी थोरात

कोल्हापूर : काेविड १९ चा आणि महापूराच्या संकटाच्या सामन्यानंतर आलेला गणेशाेत्सव काेल्हापूरवासियांनी उत्साहात साजरा केला. नागरिकांनी घराेघरी 'श्रीं'ची स्थापना करुन भक्तीभावाने पूजा अर्चा केला. आज (मंगळवार) पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहे. त्यासाठी सकाळपासून घराेघरी तसेच सार्वजनिक मंडळांची धांदल सुरु झाली आहे. दरम्यान महापालिकेने पंचगंगा नदीत panchganga river गणेश विसर्जनास ganesh idol immersion बंदी घातली आहे. भाविकांनी इराणी खणीत विसर्जन करावे असे आवाहन काेल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डाॅ. कांदबरी बलकवडे kadambari balkawade यांनी केले आहे.

शहरातील वेगवेगळ्या प्रभागांत विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ठेवले आहेत. इराणी खणीत विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य तसेच अन्य सजावटीचे साहित्य देखील नदी पात्रात टाकले जावू नये यासाठी पथक नेमण्यात आले आहे. काेविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून यापुर्वी नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. उत्सव काळात बहुतांश नागरिकांनी आराेग्य विषयक जागृती केली आहे.

आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन हाेणार असून नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीत विसर्जनास बंदी असल्याने कळंबा, मोरेवाडी येथील मंडळांनी त्यांच्या परिसरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT