#परीक्षांचाधंदाथांबवा | पुन्हा भरती प्रक्रियेची जबाबदारी 'गोंधळ घालणाऱ्या' न्यासाला! Saam Tv News
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा | पुन्हा भरती प्रक्रियेची जबाबदारी 'गोंधळ घालणाऱ्या' न्यासाला!

ज्या कंपनीच्या गोंधळामुळे अचानक परीक्षा रद्द करावी लागली आणि लाखो परीक्षार्थीं न्यासा या खाजगी कंपनीवर कारवाई करा अशी मागणी करतायत, त्या कंपनीला सरकार बदलणार नाही.

डॉ. माधव सावरगावे

आरोग्य विभागातील रद्द करण्यात आलेल्या भरती परीक्षांच्या तारखांबाबत उद्या निर्णय होणार आहे. मात्र, ज्या कंपनीच्या गोंधळामुळे अचानक परीक्षा रद्द करावी लागली आणि लाखो परीक्षार्थींनी न्यासा या खाजगी कंपनीवर कारवाई करा अशी मागणी करतायत, त्या कंपनीला सरकार बदलणार नाही. त्यामुळे परिक्षेपूर्वीच गोंधळ घालणाऱ्या न्यासा कंपनीकडेच आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी दिली आहे. (responsibility of recruitment is again to the nyasa company)

हे देखील पहा -

आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी 'न्यासा' या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला. हजारो परीक्षार्थीना याची झळ सहन करावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर न्यासा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. इतकंच नाही तर ही कंपनी ब्लॅक लिस्ट असल्याचेही समोर आले, तसा आरोप हजारो विद्यार्थ्यांनी केला. मात्र, त्या एजन्सीच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साम टीव्हीला सांगितले.

सरकारवर आरोप

राज्यात दोन दिवस घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी जवळपास साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते परीक्षा उद्या असताना अचानक रद्द करावी लागली. हे न्यासा कंपनीच्या चुकीमुळे हे सर्व घडल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे जाण्याचा कंपनीकडे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी दिली आहे, त्या न्यासा कंपनीबाबत बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्ये तक्रारी आहेत. याच कंपनीवर उत्तर प्रदेशात पेपर फोडल्याचा आणि हरियाणात महाराष्ट्रासारखा गोंधळ घातल्याचा आरोप आहे. त्याच कंपनीला महाराष्ट्रात कशी जबाबदारी दिली, यावर सरकारवर आरोप होतायत, तरीही त्याच कंपनीकडून आता उद्या जाहीर होणाऱ्या तारखेला परीक्षेचे नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी ०६ ऑगस्ट २०२१ ते २२ ऑगस्ट २०२१ आणि गट ड संवर्गातील पदासाठी ०९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार गट क आणि गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच लेखी परिक्षेचे ठिकाण, परीक्षा केंद्र, चुकीच्या हॉल तिकीटवरून मोठा गोंधळ उडाला.

ऐन परीक्षेच्या तोंडावर अनेक परीक्षार्थींना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागाने भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर आर्थिक झळही विद्यार्थ्यांना बसली. परीक्षेपूर्वीच गोंधळ, परीक्षेत आणि परीक्षेनंतर किती गोंधळ होणार असा प्रश्न परीक्षार्थींना पडलेला आहे. ज्या कंपनीने मोठी चूक केली, त्या कंपनीला सरकार का बदलत नाही असा सवाल लाखो परीक्षार्थी करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण

EC: भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांविरोधात तक्रारी,निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस

Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक; घातला २५ लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

VIDEO : ... तर आदित्यला बर्फाच्या लादीवर झोपवून मारा, रामदास कदमांचा पलटवार

Suryakumar Yadav: मानलं भावा तुला...खाली पडलेली इंडियाची कॅप पाहून सूर्याने असं काही केलं;Video पाहून कौतुकच कराल

SCROLL FOR NEXT