अमरावती जिल्ह्यात उद्याचा भारत बंद शांततेत करणार - तुकाराम भस्मे

केंद्राने लागू केलेल्या कृषी विषयक कायदे मागे घ्या, वीज विधेयक 2020 रद्द करा व नवीन शैक्षणिक धोरण 2020 मागे घ्या या मागण्यांसाठी उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात उद्याचा भारत बंद शांततेत करणार - तुकाराम भस्मे
अमरावती जिल्ह्यात उद्याचा भारत बंद शांततेत करणार - तुकाराम भस्मेअरुण जोशी
Published On

अमरावती: केंद्राने लागू केलेल्या कृषी विषयक कायदे मागे घ्या, वीज विधेयक 2020 रद्द करा व नवीन शैक्षणिक धोरण 2020 मागे घ्या या मागण्यांसाठी उद्या 27 सप्टेंबर रोजी शेतकरी संघटना व विविध राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेच्या मार्गाने करणार असल्याचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तुकाराम भस्मे यांनी स्पष्ट केले. (Tomorrow Bharat Band will peacefully in Amravati district said Tukaram Bhasme ab95)

हे देखील पहा -

भारत बंदच्या समर्थनार्थ गेल्या आठ दिवसांपासून अमरावतीच्या इर्विन चौकात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. दिल्लीत कृषी विधेयक कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे, मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं असा आरोप केला जातो आहे. त्यामुळे या बंदला सहकार्य करा असे आवाहन अमरावती येथील डाव्या आघाडी व शेतकऱ्यांनी केलं आहे. यांच्या या आवाहनाला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून उद्याचा बंद हा १०० टक्के यशस्वी होईल व हा बंद शांततेच्या मार्गाने करणार असल्याचे जेष्ठ कम्युनिष्ट नेते तुकाराम भस्मे यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात उद्याचा भारत बंद शांततेत करणार - तुकाराम भस्मे
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली असून शेतकरी, शेतमजूरही उद्याच्या बंदला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणार नसून बंदमध्ये सहभागी होणार आहे. उद्याच्या बंदला पेट्रोल पंप असोसिएशन, किराणा असोशिएशन शहरातील व्यापारी, ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांना सुद्धा बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी इर्विन चौक येथे सर्व कार्यकर्ते जमा होऊन शहरात फिरून शांततेने बंद करण्याचं आवाहन करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com