भारत नागणे/ संभाजी थोरात
पंढरपूर/ पाटण : विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यामुळे आगामी निवडणुका या ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान शरद पवारांनी ईव्हीएम विरोधात ग्रामपंचायतींनी ठराव करावेत असे आवाहन केले असतानाच पंढरपूर आणि पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ईव्हीएम समर्थनाचा ठराव ग्रामसभेत पारित केला आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महाविकास आघाडीकडून ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे ईव्हीएम विरोधात मोहीम देखील राबविण्यात आली. दरम्यान शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात ठराव करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र शरद पवार यांच्या वाढदिवशीच पंढरपूर व साताराच्या पाटण तालुक्यातील प्रत्येकी एक- एक ग्रामपंचायतीने ईव्हीएम समर्थनार्थ ठराव केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केला आहे. शिवसेनेचे सरपंच संजय साठे यांनी हा ठराव ग्रामपंचायतच्या सभेत मांडला सर्व सदस्यांनी हात वर करून ठराव मंजूर केला आहे. ईव्हीएम विरोधात मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी उठाव केल्यानंतर यांची देशभरात चर्चा सुरू झाले आहे. शरद पवार यांनी ही मारकडवाडी गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात ग्रामपंचायतींनी ठराव करावेत; असे आवाहन केले होते. त्यानंतर मात्र ईव्हीएमच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे.
आबदारवाडीतही ईव्हीएमवरच मतदान करण्याची ग्रामस्थांची मागणी
पाटण : वृक्ष संवर्धन व पर्यावरणासाठी काम करणारी असा नावलौकिक असणाऱ्या साताराच्या पाटण तालुक्यातील आबदारवाडी ग्रामपंचायतीने ईव्हीएम वरच मतदान व्हावं; असा ग्रामसभेचा बहुमताने ठराव घेतला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास कागदासाठी वृक्षतोडीसह पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून हा ऱ्हास रोखण्यासाठी ईव्हीएम व मतदान व्हावं. तसेच ईव्हीएमवर मतदान करण्यास अशिक्षित लोकांनाही सहज असून मतदान बाद होत नाही. त्यामुळे ईव्हीएमचे समर्थन ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला आहे.
शासनाकडे सादर करणार ठराव
शिवशाही सरपंच संघाच्या माध्यमातून ईव्हीएम समर्थन पाटण तालुक्यातील २५० च्यावर ग्रामपंचायतमधून असा ठराव घेणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच संघाचे अध्यक्ष व आबदरवाडीचे सरपंच विजय शिंदे यांनी दिली. ईव्हीएम समर्थनार्थ ग्रामसभेने बहुमताने ठराव केला असून तो रितसर शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती ग्रामसेविका सुजाता पवार यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.