NCP Leader Salim Sarang 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा बडा नेता RSSच्या दारात! वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांची घेतली भेट; चर्चांना उधाण

NCP Leader Salim Sarang : आरक्षणाचे रक्षण करण्याच्या आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे. या गोष्टीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलीम सारंग यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी इंद्रेश कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भर दिला.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)चे वरिष्ठ प्रचारक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलीम सारंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत. त्याच दरम्यान आरएसएसच्या नेत्याची त्यांनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान सलीम सारंग हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

दरम्यान आपली इंद्रेश कुमार यांच्याशी झालेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग म्हणालेत. या भेटीत शिक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आरक्षणाचे संविधानिक संरक्षण, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकास यांसारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सलीम सारंग यांनी स्वतः सोशल मीडियावर म्हटले आहे. मात्र या भेटीचे राजकीय पडसाद राजकारणात तसेच मुस्लिम समुदायात उमटू लागल्याचे दिसत आहे.

या भेटी बाबत राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग यांनी सांगताना आपल्यात कोणत्या गोष्टीबाबत चर्चा झाली याची माहिती दिली. या भेटीत शिक्षण क्षेत्रासमोरील सध्याची आव्हाने, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणातील समान संधी, आरक्षणाचे संविधानिक संरक्षण आणि समाजातील वंचित घटकांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात आपण सविस्तर चर्चा केली असल्याचं सलीम सारंग म्हणाले. शिक्षण हे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे आणि सामाजिक न्यायाची भावना कायम ठेवत आरक्षणाचे संरक्षण होणे ही काळाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग यांना मांडले.

अजित पवारांच्या आठवणीत सलीम सारंग भावूक

अजित पवार यांच्या कार्यशैली, जनसंपर्क आणि राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करताना त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांची पोकळी जाणवत असल्याचं ते म्हणाले होते. अजित पवार यांच्या जाण्याने सामान्य कार्यकर्त्यांचा आधार हरपला. अजितदादांची पोकळी जाणवतेय. कामासाठी नेत्यांना भेटताना आधी ओळख सांगावी लागते अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असं म्हणत त्यांनी आपली खदखद एका पत्राद्वारे बोलून दाखवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुंदर वाटीका मार्गे कोंडाळा झामरेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था ;दुचाकी घसरून अपघात

मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, ७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावं पोर्टलवर, या दिवशी खात्यात येणार पैसे?

EPFO Update : पीएफ खात्यात व्याज जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का? असे तपासा

तोंड धुतल्यानंतर फक्त २ मिनिटे करा हे काम; मेकअपशिवायही चेहरा दिसेल ग्लोइंग

Ratnagiri Tourism : खडतर चढाई पण निसर्गाचे अद्भुत नजारे, रत्नागिरीतील 'हा' ट्रेकिंग स्पॉट एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT