Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Stock market crash: भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स 600 अंकांहून अधिक घसरला, तर निफ्टी 22,600 च्या खाली आला. कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक बाजारातील दबाव आणि भू-राजकीय अनिश्चिततेचा बाजारावर परिणाम झाला.
Stock market crash
Stock market todaysaam tv
Published On: 

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळतेय. सोमवारी घसरण झाल्यानंतर मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात लाल चिन्हात झाली. सुरुवातीला किरकोळ घसरण दिसत होती. मात्र बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच विक्रीचा दबाव वाढला आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक वेगाने कोसळले.

बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 600 अंकांहून अधिक घसरला. तर एनएसईचा निफ्टीही 22,600 च्या आसपास आला. या घसरणीचा फटका अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सना बसला आहे.

Stock market crash
DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2026 मध्ये ‘या’ राज्यांनी वाढवला DA, तुमच्या राज्याचा नंबर आहे का?

सेन्सेक्स-निफ्टीची खराब सुरुवात

सोमवारी मोठ्या घसरणीनंतर सेन्सेक्स 72,771 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 72,633 अंकांवर होता. मात्र बाजार सुरू झाल्यानंतर लगेचच घसरण वाढली. अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 600 अंकांहून अधिक घसरून 72,136 अंकांवर पोहोचला.

निफ्टीचीही अशीच स्थिती पाहायला मिळाली. सोमवारी निफ्टी 22,780 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी तो 22,732 अंकांवर किरकोळ घसरणीसह उघडला. त्यानंतर मात्र निफ्टीमध्ये अचानक मोठी घसरण झाली आणि तो 200 अंकांहून अधिक घसरून 22,580 अंकांच्या पातळीवर आला.

सोमवारी बाजारात मोठा धक्का

सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. संपूर्ण दिवस सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव राहिला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 1,124 अंकांनी घसरून 72,771 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्येही 260 अंकांची घसरण झाली आणि तो 22,780 अंकांवर बंद झाला.

या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 8.81 लाख कोटी रुपये बुडाले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्यही मोठ्या प्रमाणात कमी झालंय. शुक्रवारी बाजार बंद होताना या कंपन्यांचे मार्केट कॅप 4,83,25,067.26 कोटी रुपये होते. सोमवारी बाजार बंद होताना ते कमी होऊन 4,74,43,885.65 कोटी रुपये राहिले.

Stock market crash
Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

परदेशी बाजारातूनही खराब संकेत

भारतीय बाजारातील घसरणीचे संकेत परदेशी बाजारातून आधीच मिळत होते. अमेरिकेच्या शेअर बाजारात मागील व्यवहाराच्या दिवशी मोठी घसरण झाली होती. डाऊ जोन्स 347 अंकांनी, तर नॅसडॅक 248 अंकांनी खाली आला होता.

मंगळवारी आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली. जपानचा निक्केई जवळपास 800 अंकांनी घसरून व्यवहार करत होता. हँग सेंग इंडेक्समध्येही सुमारे 200 अंकांची घसरण झाली. भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वाचा संकेत मानला जाणारा गिफ्ट निफ्टीही बाजारात घसरण होण्याचे संकेत देत होता. त्यामुळे भारतीय बाजारात मंगळवारी सुरुवातीपासूनच दबाव पाहायला मिळाला.

Stock market crash
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही घसरले

शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असताना अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही खाली आले. बजाज फायनान्सचा शेअर 2.10 टक्क्यांनी, एचडीएफसी बँकेचा शेअर 1.70 टक्क्यांनी, कोटक बँकेचा शेअर 1.50 टक्क्यांनी आणि रिलायन्सचा शेअर 1.30 टक्क्यांनी घसरला.

Stock market crash
Pune : इन्स्टाग्रामवरील 'सिया'च्या जाळ्यात अडकला पोलीस पाटील, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६ लाखांना गंडवले

इन्फोसिसच्या शेअरमध्येही 1.40 टक्क्यांची घसरण झाली. मिडकॅप कंपन्यांमध्ये पॉलिसी बाजारचा शेअर तब्बल 4 टक्क्यांनी घसरला. तर आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये 2.15 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com