राधानगरी’ च्या स्वयंचलित दरवाजांची पंचवार्षिक दुरुस्ती सुरु - Saam Tv
महाराष्ट्र

राधानगरी’ च्या स्वयंचलित दरवाजांची पंचवार्षिक दुरुस्ती सुरु

एरव्ही पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यानंतरच खुले होणारे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे आता ऐन उन्हाळ्यात खुले करण्यात आले आहेत. त्याचे कारण आहे या दरवाजांच्या आवश्यक डागडुजीचे सुरू केलेले काम

साम टिव्ही


राधानगरी : एरव्ही पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यानंतरच खुले होणारे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे आता ऐन उन्हाळ्यात खुले करण्यात आले आहेत. त्याचे कारण आहे या दरवाजांच्या आवश्यक डागडुजीचे सुरू केलेले काम. जलसंपदा विभागाने दरवाजांच्या विशेष देखभाल दुरुस्तीवर भर दिला आहे. त्यासाठी सर्व दरवाजे उघडले आहेत. (Repairing of gates of Radhanagari dam going on)

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दरवाजांच्या देखभाल दुरुस्तीचे काम नियमितपणे केले जाते; मात्र धरण पूर्ण भरल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा (Water) विसर्ग हे दरवाजे खुले झाल्यानंतरच होतो. धरण सुरक्षेच्या दृष्टीने हे दरवाजे महत्त्वाचे असल्याने साधारणपणे पाच वर्षांनी त्याच्या विशेष देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते.

फेब्रुवारीनंतर धरणातील (Dam) पाणीसाठा कमी होत असल्याने या स्वयंचलित दरवाजांच्या भागात पाणी राहत नाही. या काळात देखभाल दुरुस्तीचे काम होते. पावसाळा आणि त्यानंतर पाण्यात घट होईपर्यंत सहा महिन्यांपर्यंत हे दरवाजे पाण्यातच राहतात. त्यातून काही काळाने दरवाजांच्या आतील बाजूस गंज चढतो. त्यामुळे दरवाजे तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत राहण्यासाठी विशेष दुरुस्ती गरजेची ठरते. सातही दरवाजे खोलून गेट लिफ्टिंग, क्लिनिंग, नवीन रबर सील, अँगलना रंगकाम आदी कामे केली जात आहेत.

स्वयंचलित दरवाजांच्या विशेष दुरुस्तीचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरवाजे सुस्थितीत आणि विसर्गासाठी सक्षम असले तरी त्यांचे परिचलन तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सुरू राहावे, यासाठी विशिष्ट काळानंतर दरवाजांची विशेष देखभाल दुरुस्ती करण्यात येते. काटेकोरपणे तांत्रिक तपासणी केली जाते.
- प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, राधानगरी धरण.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT