sangli, rain, koyna dam, irwin bridge water level saam tv
महाराष्ट्र

Sangli News: सांगली, कुपवाड शहराला आठवडाभरच पाणी पूरेल, काेयना धरणाचे पाणी द्या : महापालिका

irwin bridge water level : कृष्णा नदीत कोयनेतून विसर्ग करण्याची गरज लागू शकते.

विजय पाटील

Sangli News : सांगलीजवळ कृष्णा नदीचे (krishna river) पात्र पुन्हा कोरडे पडू लागले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णा नदीचे हे असे कोरडे पात्र सांगलीकर (sangli) बऱ्याच वर्षांनी पाहत आहेत. सध्या आयर्विन पुलाच्या (irwin bridge sangli) खालचे कृष्णा नदीचे कोरडे पात्र दिसू लागले आहे. (Maharashtra News)

सध्यातरी नदीने काही ठिकाणी तळ गाठला असला तरी सांगली, कुपवाड शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ आठवडाभर पाणी उपसा होईल इतका पाणी साठा आहे. आठवड्याभरात मात्र पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर मात्र कृष्णा नदीत कोयनेतून विसर्ग करण्याची गरज लागू शकते.

जर पावसाने अशीच ओढ घेतली तर मात्र पाणी टंचाई आणखी वाढू शकते. दुसरीकडे पुढील महिन्यात गणपतीचे आगमन-विसर्जन होणार असल्याने मोठा पाऊस पडला नाही तर गणपती विसर्जनासाठीचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. दरम्यान महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला कोयना धरणातून (koyna dam) नदीत पाणी सोडण्याबाबत विनंती केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT