green refinery project (file photo)
green refinery project (file photo) saam tv
महाराष्ट्र

Video : वेदांतानंतर 'हा' प्रकल्प जाणार महाराष्ट्राबाहेर ? सरकारनं गमावली एक लाख काेटींची गुंतवणुक

अमोल कलये

रत्नागिरी : वेदांतानंतर कोकणातला रिफायनरी प्रकल्प (refinery project) देखील राज्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला (maharashtra government) अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी एक महिन्याचा अल्टिमेंटम देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Ratnagiri Latest Marathi News)

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे समोर आले आहे. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच आता काेकणातील रिफायनरी प्रकल्प देखील महाराष्ट्रातून बाहेर जाणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. रिफायनरी प्रकल्प करणारी कंपनी आरआरपीसीएल राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्याची तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितलं.

ही कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पाच्या ग्रीन सिग्नलसाठी प्रतिक्षेत आहे. रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षापासून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणपुर्ण होण्यास विरोधकांच्या अडसर तर प्रशासनाची गुळमुळीत भुमिकेमुळे कंपनी नाराज झाली आहे.

रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्प २०१८ सालापासून रखडलेला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प ६० मिलियन मॅट्रिक टनाचा आहे. आता विलंबामुळे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प २० मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा आहे. रिफायनरीचा पहिला प्रकल्प ३ लाख कोटींचा. विलंबामुळे २ लाख कोटींची अपेक्षित गुंतवणुक. विलंबामुळे राज्य सरकारने १ लाख कोटींची गुंतवणुक गमावली अशीही चर्चा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अंबाजोगाई रिंग रोडवर कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक पलटी

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

Mayank Yadav: मयांक यादवचं नशीब फळफळणार!BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT