Reel star crime  Saam tv
महाराष्ट्र

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Reel star news : 50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार चोर निघाल्याचे समोर आलं आहे. तिने बॉयफ्रेंडच्या मदतीने आतापर्यंत लाखोंचा ऐवज चोरी केलाय.

Vishal Gangurde

अहिल्यानगरमध्ये रिलस्टार निघाली चोर

रिलस्टार बसमधील महिला प्रवाशांच्या करायची पर्स चोरी

रिलस्टार तरुणीच्या बॉयफ्रेंडही अट्टल गुन्हेगार

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर : रिलस्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेली एक तरुणी पैशांच्या मोहापायी बसमधील प्रवासी महिलांच्या पर्स चोरी करायची. अहिल्यानगरमधील या रिलस्टारने बॉयफ्रेंडच्या मदतीने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्यात. या बंटी आणि बबलीची पोलखोल नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवास करताना महिलांच्या पर्स चोरीचे प्रमाण जास्त वाढले होते. त्याकरता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यांबाबत छडा लावण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. त्याचवेळी 19 नोव्हेंबर रोजी पाथर्डी बस स्थानकावरून एका महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरीला गेली. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पाथर्डी परिसरात लक्ष केंद्रित केले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कोमल काळे ही 19 वर्षाची तरुणी रिलस्टार असून तिच्या प्रियकराच्या मदतीने पर्स चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोमल काळे हिला पकडून अधिक माहिती घेतली. त्यावेळी तिचा पंचवीस वर्षीय प्रियकर सुजित राजेंद्र चौधरच्या मदतीने या चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे.

बंटी आणि बबलीकडून नवीनच बाजारात आलेला प्रो मॅक्स आयफोन, तसेच ओपो कंपनीचा महागडा फोन साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असा जवळपास नऊ लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांनी यापूर्वी बसमधील प्रवाशांच्या पर्स चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

विशेष म्हणजे कोमल काळे हिच्या विरुद्ध बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी तीन गुन्हे नोंद आहेत. तर सुजित चौधरी याच्यावर दरोडा जबरी चोरी घघरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : नगरच्या व्यक्तीचा सिंहगड किल्ल्यावर मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उभारले पुस्तकांचे झाड

Kokan Railway Jobs: खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी; या पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?

Homemade Jalebi Recipe: मिठाईच्या दुकानात मिळणारी खमंग, कुरकुरीत जिलेबी कशी बनवायची?

Viral Video: सुस्त नाही तर सुपरफास्ट! स्पीड बोटच्या मागे तुफान वेगाने आली मगर, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

SCROLL FOR NEXT