चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची विक्रमी कामगिरी SaamTVnews
महाराष्ट्र

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची विक्रमी कामगिरी

गेल्या २३ दिवसांपासून सातही संचांमधून अखंड वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता व त्या अनुषंगाने विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे. गेल्या २३ दिवसांपासून सातही संचांमधून अखंड वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे. सद्यःस्थितीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता 2920 मेगावॅट इतकी आहे. चंद्रपूर येथे ५०० मेगावॅटचे एकूण ५ संच व २१० मेगावॅटचे २ संच कार्यरत आहेत.

हे देखील पाहा :

४ एप्रिलपासून आजतागायत या सातही संचांमधून गेले २4 दिवस सलग अहोरात्र वीजनिर्मिती सुरु आहे. एक एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने एकूण 1334 दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती केली आहे. अखंड वीजनिर्मितीतील चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. या आधीच्या विक्रमानुसार डिसेंबर २०१८ मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सर्व संच सलग २१ दिवस कार्यरत होते. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे देशातीलच नव्हे तर आशियातील एक महत्वाचे महाऔष्णिक वीज केंद्र आहे. 

या विद्युत निर्मिती केंद्राने आजवर वीज निर्मितीचे अनेक विक्रम नोंदविले असून महानिर्मितीच्या एकूण औष्णिक वीजनिर्मितीत नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे.  ही विक्रमी कामगिरी चंद्रपूर येथील सर्व संचांची देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याने झाली आहे. उपलब्ध कोळसा साठ्याचा जबाबदारीने वापर यामुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे.  विशेष म्हणजे महानिर्मितीच्या सातही वीजनिर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारा विजेचा दर हा सर्वांत स्वस्त असून तिथून जास्तीत जास्त वीजनिर्मिती साध्य झाल्याने राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News: महाराष्ट्र हादरला! संत इंद्रदेव महाराजांचं भयंकर कांड, आश्रमात बोलावून महिलेवर लैंगिक अत्याचार

Raj Thackeray : सत्तेत असून मोर्चे कसले काढताय? राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

digestion boosting drinks: कोल्डड्रिंक्स सोडा, हे ७ नैसर्गिक ड्रींक वाढवतील तुमची इम्युनिटी आणि एनर्जी

Maharashtra News Live Update : ठाण्यातील मुंब्रा परिसरात शाळकरी मुलांची फ्री स्टाईल हाणामारी

Shani Vakri 2027 : २०२७ मध्ये शनीची उलटी चाल! १३८ दिवस या ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT