सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सज्ज - गृहराज्यमंत्री देसाई ओंकार कदम
महाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सज्ज - गृहराज्यमंत्री देसाई

सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता सातारा जिल्ह्यात जिल्हामध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

ओंकार कदम

सातारा - सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता सातारा जिल्ह्यात जिल्हामध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. साताऱ्यात जिल्हाबँकेची ही निवडणूक राजकारण विरहित होईल असे आधीच्या संचालकांचे म्हणणे आहे.

हे देखील पहा -

परंतु, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे असे विधान करून, जर पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर आम्ही रिंगणात आहोत असा एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

मागच्या निवडणुकीत शब्द देऊन सुद्धा शंभूराज देसाई यांना जिल्हा बँकेपासून लांब ठेवण्यात आले होते त्यामुळे आता शिवसेनेने मोर्चे बांधणी केली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या वेळी स्वतः गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगाव चे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे, माण-खटाव चे शिवसेनेचे हेविवेट नेते शेखर गोरे हे जिल्हाबँक निवडणुकीत इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जर ही निवडणूक लढली गेली नाही तर जिल्हाबँकेत जोरदार घमासान होणार यात शंका नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

Tiger Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून घातली झडप, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?

धक्कादायक!'२१ वर्षांपर्यंत थांब' म्हणताच १९ वर्षीय प्रियकराने संपवलं आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

SCROLL FOR NEXT