Marathi Sahitya Sammelan News Saamtv
महाराष्ट्र

Marathi Sahitya Sammelan: मोठी बातमी! ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Dnyaneshwar Choutmal

Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (२५, जून) पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

रवींद्र शोभणे (Ravindra Shobhane) हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. हे संमेलन डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर (Amalner) येथे नियोजित असणाऱ्या आगामी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड पुण्यातील बैठकीत झाली. अमळनेर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान कोणाला मिळणार, याची साहित्य वर्तुळात मोठी उत्सुकता लागली होती.

यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. अखेर या बैठकीत कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत संमेलनाच्या नियोजनाबद्दलही चर्चा करण्यात आली.

दरम्यान, शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, 'उत्तरायण'साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, 'उत्तरायण'साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार आदींचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT