रविकांत तुपकारांच्या वाहनाचा अपघात; दोन बाईक्सवार जखमी... संजय जाधव
महाराष्ट्र

रविकांत तुपकारांच्या वाहनाचा अपघात; दोन बाईक्सवार जखमी...

ही घटना काल ( २२ नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

संजय जाधव

बुलढाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे मुंबईला जातअसताना बेराळा फाटा (ता. चिखली) येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना काल ( २२ नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. येवता येथून बेराळा येथे जाताना रस्ता ओलांडणारे दोन दुचाकीस्वार तुपकरांच्या गाडीला धडकले. यात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

हे देखील पहा -

अपघात घडताच तुपकरांनी दोघांनाही आपल्या वाहनात घेऊन चिखली येथील डॉ. महिंद्रे रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही तरुणांना औरंगाबाद येथे नेण्यात आले. स्वतः रविकांत तुपकर जखमी तरुणांना औरंगाबादला घेऊन गेले.

२४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईला बैठक होत आहे. या बैठकीसाठी रविकांत तुपकर हे सौरभ सावजी यांच्या मालकीच्या असलेल्या इनोव्हा कारने मुंबईसाठी निघाले होते. चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली.

दुचाकी चालवणार तरुण हा नवीनच दुचाकी चालविणे शिकला असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात तुपकरांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर लगेच तुपकरांनी दोन्ही तरुणांना चिखली येथील रुग्णालयात दाखल केले. तुपकरांनी स्वतः त्यांचे वाहन चिखली पोलीस ठाण्यात जमा केले. त्यानंतर दोन्ही तरुणांना रुग्णवाहिकेत घेऊन तुपकर औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT