Ravikant Tupkar on Gulabrao Patil Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar on Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी जमत नसले तर राजीनामा द्यावा, रविकांत तुपकर संतापले

Buldhana Rain News : कठीण काळात पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाही, त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमळे या दोन्ही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान आहे. तसेच घरांचे देखील नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र अशी कठीण काळात पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाही, त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

दोन आठवडे उलटून गेले तरी नुकसानग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे , ते पालकमंत्री गुलाबराव पाटील साधी पाहणी करायला सुद्धा आले नाही. साधी विचारपूस देखील त्यांनी केली नाही. पालकमंत्री असंवेदशील आहेत. त्यांना जमत नसले तर राजीनामा द्यावा , अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. (Latest News Update)

पालकमंत्री जनतेला वेठिस का धरत आहे. दुसरा पालकमंत्री असता तर काहीना काही हालचाल केली असती. मदत केली असती किमान शेतकऱ्यांना जाऊन भेटले असते. पण गुलाबराव पाटील कोणत्या काळजाचा माणूस आहे. त्यांची बुलडाणा जिल्ह्यावर वक्रदृष्टी का आहे. त्यांची बुलडाणा जिल्ह्याही काही दुश्मनी आहे का? असा सवालही तुपकर यांनी विचारला. (Political News)

गुलाबराव पाटील तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. विधानभवनात तुम्ही काय अंडी उबवायला गेले आहात का? अडचणीच्या वेळी पालकांनी धावून येण्याची गरज असते. मात्र गुलाबराव पाटील कुठे फरार आहेत, हे आता शोधण्याची वेळ आली आहे. जमत नसेल तर तातडीने तुम्ही राजीनामा द्या आणि एखादा कर्तव्यदक्ष दुसरा पालमंत्री बुलडाणा जिल्ह्याला द्यावा, अशी मागणी आमची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant: मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! प्रति तोळा सोन्याचा भाव दीड लाखांवर, मुंबई पुण्यात कसे आहेत दर?

Maharashtra News Live Update : ५ हजार कोटींत शिवसेना विकली, संजय राऊतांचा आरोप

Skipping dinner and cholesterol: रात्रीचं जेवण टाळल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT