Pune Bhimashankar News : भिमाशंकरला पर्यटकांची मोठी गर्दी, वाहनांच्या ४-५ किमीपर्यंत रांगा

Bhimashankar Crowd News : बसच्या प्रतीक्षेत भाविकांना भर पावसात रांगेत उभं रहावं लागत आहे.
Bhimashankar
BhimashankarSaam TV
Published On

Pune News : पावसाळा त्यात सुट्टीचा दिवस म्हटलं की अनेकांचे पाय पर्यटनस्थळी वळतात. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पुण्यातील भिमाशंकर येथेही हजारो पर्यटकांची गर्दी दिसत आहे. भिमाशंकरला दर्शनासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणांहून लोक येत असतात. आज मात्र या गर्दीमुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कारण वाहनांच्या लांबच लांब रांगा याठिकाणी लागल्या आहेत.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भिमाशंकर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बसच्या प्रतीक्षेत भाविकांना भर पावसात रांगेत उभं रहावं लागत आहे. (Pune News)

विकेंडची सुट्टी आणि आधिक मास सुरु असल्याने भाविकांसह पर्यटक मोठ्या संख्येने भिमाशंकरच्या परिसरात दाखल होत असल्याने ही गर्दी झाली आहे. भाविकांच्या वाहनांचा पाच ठिकाणी वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. मात्र पार्किंग फुल झाल्याने गर्दी वाढत आहे.

Bhimashankar
Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये गावगुंडाची दहशत कायम, अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी 15 वाहनांची तोडफोड

भाविकांना पार्किंग ते मंदिरापर्यंत एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र गर्दी वाढल्याने बसची तासांतास वाट पाहावी लागत असल्याने भिमाशंकर परिसरातील प्रशासनाचे नियोजन ढासळलेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. (Latest News Update)

Bhimashankar
Kalyan Crime News: कल्याण हादरले! बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरची भावांकडून हत्या, मृतदेह उल्हास नदीत फेकला

पावसाचा जोर वाढला

एकीकडे ही ससस्या असताना भिमाशंकर पावसाचा जोरही वाढला आहे. वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. अशात भर पावसात भाविकांना पार्किंग ते मंदिरापर्यंत पायी आणि बसने जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com