Ravikant Tupkar
Ravikant Tupkar  saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी सरकारला दिली डेडलाइन

संजय जाधव

Ravikant Tupkar : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील ३० ते ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळालेला नाही. नामंजूर असलेल्या शेतकऱ्यांनाही कंपनीने विमा देणार असे म्हटले परंतु प्रत्यक्षात त्यांना अद्याप पिकविमा मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांना तफावतीची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांत शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्यास पुन्हा एकदा आर या पार आंदोलन (aandolan) छेडण्याचा इशारा तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित पिकविम्यासाठी रविकांत तुपकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची भेट घेतली. रविकांत तुपकर यांच्या जलसमाधी व आत्मदहन या आंदोलनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख १ हजार ६११ शेतकऱ्यांना १५८ कोटी ९८ लाख ६६ हजार ५२२ रुपये मिळाले आहेत. परंतू अद्याप पिकवीमा मंजूर असलेल्या ३० ते ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा झालेला नाही. तसेच तुपकरांनी २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात केलेल्या आंदोलनानंतर नामंजूर असलेल्या शेतकऱ्यांनाही पिकवीमा देवू असे कंपनीने लेखी दिले होते.

त्यानुसार नामंजूर असलेले शेतकरीही पिकविम्यापासून वंचित आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांना पिकविम्यापोटी अत्यल्प रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यात ७ हजार ५१३ शेतकऱ्यांना एक हजार पेक्षा कमी पिकविमा मिळाला आहे. तर अनेकांना प्रीमियम पेक्षाही कमी रक्कम मिळाली आहे.

त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी चिखली व मेहकर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केल्यानंतर तफावत अहवाल तयार करण्यात आले. चिखली तालुक्यातील तफावत अहवालनुसार अत्यल्प रक्कम मिळालेल्या १६ हजार ६९२ शेतकऱ्यांना तफावतीची ४ कोटी ७२ लाख ८२१ रुपये रक्कम मिळणे गरजेचे आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आहे. (Maharashtra News)

त्यामुळे मंजूर-नामंजूर व अत्यल्प रक्कम मिळालेल्या, शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसांच्या आत पिकविमा प्रदान करावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. आठ दिवसांत पीकविमा जमा न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी तातडीने कंपनीला पत्र पाठविले असून २० मार्चपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांना पिकविमा जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

SCROLL FOR NEXT