Ravikant Tupkar criticizes Chief Minister Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar on CM Ayodhya visit : रोम जळत असताना राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी राज्याची अवस्था; रविकांत तुपकर यांची टीका

Ravikant Tupkar on Chief Minister Eknath Shinde: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौऱ्यावर टीका केली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Ravikant Tupkar on Chief Minister Eknath Shinde: राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलेलं असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौऱ्यावर टीका केली आहे.

रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे अशी टीका रविकांत तुपकर यानी केली आहे. ते म्हणाले, वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचे दर्शन उशिरा सुद्धा घेता आल असतं. पण आज महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारच होतं.

अयोध्येला पुढच्या महिन्यात जाता आलं असतं

रविकांत तुपकर म्हणाले, "पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण हे सरकारच काम होत. अन्नदाता हा साक्षात परमेश्वर आहे. जिवंत माणसं सोडायची अन देवाच्या दर्शनाला पळायचं यापेक्षा अयोध्येचं दर्शन पुढच्या महिन्यात घेतलं असतं तरी चाललं असतं. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जिवंत ठेवणे हे खऱ्या अर्थाने सरकारचं काम होत."

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अन्यथा...

सरकारण पूर्णपणे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे. तातडीने या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा आणि आर्थिक मदत द्या अशी मागणी देखील तुपकर यांनी केली आहे. ते म्हणाले, आक्टोबर आणि सप्टेंबरची नुकसान भरपाईची मदत अद्याप मिळाली नाही. ती मदत ताबोडतोब द्या आणी आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आक्रमक आंदोलनाला सामोरे जाव लागेल, असा ईशारा देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT