Devendra Fadnavis / Ravi Rana
Devendra Fadnavis / Ravi Rana Saam TV
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणाताना त्रास होतोय; रवी राणांनी व्यक्त केली खदखद

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

अमरावती: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री म्हणताना आपल्याला त्रास होतोय. तोंडातून मुख्यमंत्री असाच शब्द निघतोय, २०२४ ला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू असं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलं आहे.

अमरावतीमध्ये आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडी (Dahihandi) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं.

पाहा व्हिडीओ -

अमरावतीमधील (Amravati) दहीहंडीसाठी आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केलं होत. शिवाय आजच्या दहीहंडी कार्यक्रमाचे औचित्य साधत त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केलं आहे. फडणवीस यांच्या वजनाएवढं रक्त संकलन करण्याचा निर्धार देखील राणा यांनी केला आहे.

या कार्यक्रमात बोलताना राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणताना आपल्याला त्रास होत असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, ' उपमुख्यमंत्री म्हणताना आपल्याला त्रास होतोय. तोंडातून मुख्यमंत्री असाच शब्द निघतोय, २०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच होतील त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाय गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, मंत्रिपदासाठी लालसा नाही. अमरावती जिल्ह्यात कुणालाही मंत्रीपद मिळालं तरीही त्यांच्यासोबत मिळून काम करु, मंत्री पदाची लालसा नाही. अमरावती महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, महापौर भाजपचाच (BJP) असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी शांत करण्यात भाजपला यश; दिंडोरी मतदारसंघात भारती पवारांना दिलासा

Nashik Lok Sabha News : 1 मिनिट बाकी असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला! अनिल जाधवांच्या माघारीनं कुणाला दिलासा?

Honeymoon Dress Ideas: हनिमूनसाठी हटके ड्रेस आयडिया

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

SCROLL FOR NEXT