Loksabha Election: हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी शांत करण्यात भाजपला यश; दिंडोरी मतदारसंघात भारती पवारांना दिलासा

Dindori Loksabha Election: दिंडोरी मतदारसंघात तिहेरी लढत होणार होती. परंतु चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता येथे शरद पवार गट आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे.
Dindori Loksabha Election
Dindori Loksabha ElectionSaam Tv

अभिजीत सोनवणे

नाशिक : दिंडोरी मतदारसंघातील भाजप आणि उमेदवार डॉ. भारती पवार यांनी दिलासा देणारी बातमी हाती आलीय. येथील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना संधी देण्यात आल्याने चव्हाण नाराज होते. चव्हाण यांनी २०१४ मध्ये भारती पवार यांचा पराभव करत दिली गाठली होती. त्यामुळे आताही ते निवडणुकीच्या रिंगणात राहिले असते तर भारती पवार यांना विजय मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली असती.

दिंडोरी मतदारसंघातील मतदानाची वेळ जवळ आली असून राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जातोय. दिंडोरी मतदारसंघात तिहेरी लढत होणार होती. परंतु चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता येथे शरद पवार गट आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांनी उमेदवारी देण्यात आलीय. दिंडोरीमधील लढत अधिक आव्हानात्मक होऊ नये यासाठी भाजपकडून त्यांची समजूत काढण्यात येत होती. आज शेवटी चव्हाण यांचं मन वळण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

महायुतीकडून भाजप नेत्या डॉ. भारती पवार यांना दुसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु भाजपने उमेदवार दिल्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण हे शरद पवार गटाकडे गेले. पण तेथेही त्यांना दिल्लीचं तिकीट मिळालं नाही, शेवटी चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.

चव्हाण यांच्या या निर्णयामुळे भारती पवार यांच्या पुढील आव्हान वाढलं होतं. भारती पवार ह्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. परंतु २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना खासदारकी लढवण्याची संधी देण्यात आली होती.

Dindori Loksabha Election
Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com