Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

Nashik Loksabha Latest News: नाशिक लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र शांतीगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता चांगलीच वाढण्याची शक्यता आहे.
Shantigiri Maharaj
Shantigiri MaharajSaam Tv

नाशिक|ता. ६ मे २०२४

नाशिक लोकसभेत अपक्ष रिंगणात उतरलेले शांतीगिरी महाराज यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र शांतीगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता चांगलीच वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी माघार घेण्याबाबत कोणतीही हालचाल केली नसून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. शांतीगिरी महाराजांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे.

नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच महंत शांतीगिरी महाराज यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. शांतीगिरी महाराजांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. याऊलट शांतीगिरी महाराजांनी खरं हिंदुत्व कुणाचं हे आता जनताच ठरवेल असे म्हणत महायुतीनेच मला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट होताना दिसत आहे.

Shantigiri Maharaj
बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

दरम्यान, नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी नेत्यांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा एक मिनिट बाकी असताना भाजपचे अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर त्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी हेमंत गोडसे यांना अनिल जाधव यांची वट पाहत ताटकळत उभे राहिले. त्यामुळे अर्ज माघार घेण्यासाठी शिंदेंच्या नेत्यांची पळापळ पाहायला मिळाली.

Shantigiri Maharaj
Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com