Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

Gadchiroli Naxal News Today: 6 प्रेशर कुकरमध्ये पुरून ठेवलेली 9 आयईडी आणि 3 क्लेमोर स्फोटकं पोलिसांनी जप्त केली आहेत.

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा भुसुरुंग स्फोटाचा डाव पोलिसांनी उधळला. 6 प्रेशर कुकरमध्ये पुरून ठेवलेली 9 आयईडी आणि 3 क्लेमोर स्फोटकं पोलिसांनी जप्त केली आहेत. गडचिरोली पोलिसांची ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी मोठा कट रचला होता. हा कट पोलिसांनी उधळून लावला. नक्षल्यांनी जमिनीत 6 प्रेशर कुकरमध्ये पुरून ठेवलेली 9 आयईडी आणि 3 क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com