Ravi Rana Saam TV
महाराष्ट्र

रवी राणा मातोश्रीवर करणार हनुमान चालीसा पठण; मुंबईचं तिकिट केलं बुक

मुंबईला जायचं तिकीट देखील बुक केल्याची माहीती आमदार रवी राणा यांनी दिलेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणावी नाही तर मी मातोश्री वर हनुमान चालीसा म्हणू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी मातोश्रीवर जाण्याची तयारी सुरु केली आहे. रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्यानुसार ते आता मातोश्रीवर जाण्यासाठी सज्ज झाले असून मुंबईला जायची तारीख देखील ठरवली आहे.

येत्या २२ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर (Matoshri) जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असून त्यासाठी मुंबईला जायचं तिकीट देखील बुक केल्याची माहीती आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

हनुमान जयंतीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानकावर जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं होतं. राणा यांच्या आव्हानानंतर शिवसेनेने (Shivsena) देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. धार्मिक तेढ पसरवून दंगल माजवायची आहे का?, असा प्रश्न मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा यांना विचारला होता. तर राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी निदर्शने देखील केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी

Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र, ६८०० कोटींची सरकार वसुली होणार?

कोणतेही पुरावे सापडले नाही...; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाची निरीक्षणे काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT