रुपाली बडवे -
मुंबई : अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता ST कर्मचारी (ST Employee) कामावरती हजर होत आहेत. आजपर्यंत जवळपास ८४ टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. याच पार्श्वभूमिवर आज माध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी वकील गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली. ते म्हणाले, 'सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अशिक्षित आणि भावनिकतेचा फायदा घेतला, गरीब लोकांना लुटून सदावर्तें (Gunaratna Sadavarte) सारखी लोक स्वतःची घर भरतात आज सगळं काही उघड झालं असल्याचं परब म्हणाले.
तसंच गेल्या ५ महिन्यात परिवहन विभागाचे मोठं नुकसान झालं आहे तसंच कर्मचाऱ्यांचे सुध्दा नुकसान झालं आहे. एसटीचे विलनिकरण करूनच देऊ, असं बोलून सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करत होते. आम्ही पगारवाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन थांबवायला पाहिजे होतं असही ते म्हणाले.
दरम्यान, कर्मचारी आमचेच आहेत. आज अनेक कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारचं आंदोलन होणार नाही, याची काळजी परिवहन विभाग घेईल असं सांगतच आता एसटीचे ८४ टक्के कर्मचारी कामावर हजर झाल्याचही त्यांनी सांगितलं.
एसटीची सध्यस्थिती
८० टक्के गाड्या सुरू
एकूण रस्त्यावर बसेस - ९७६८
एकूण चालू फेऱ्या - २७७५७
पूर्वी
एकूण बसेस - १२८६१
एकूण फेऱ्या - ३६५८८
असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.