Ratnagiri Crime news Saam Tv
महाराष्ट्र

बेपत्ता तरुणीचं गूढ उकललं; खंडाळ्यात खून अन् आंबा घाटात फेकलं, बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Ratnagiri Shocker: रत्नागिरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा खून तिच्याच प्रियकराने केला असल्याचं तपासातून उघड झालं आहे.

Bhagyashree Kamble

  • रत्नागिरी तालुक्यातील बेपत्ता तरुणी भक्ती मयेकरचा खून तिच्या प्रियकरानेच केला.

  • आरोपी दुर्वास पाटीलने खंडाळा येथे नेऊन आंबाघाटात खून करून मृतदेह टाकला.

  • पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मृतदेह शोधून काढला.

  • या प्रकरणी प्रियकरासह आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

रत्नागिरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीच्या मृत्यूबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केली असल्याचं तपासातून उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

भक्ती जितेंद्र मयेकर असे मृत तरूणीचे नाव आहे. ती रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातील रहिवासी होती. दुर्वास दर्शन पाटील असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी भक्तीला खंडाळा येथे नेले. आंबा घाटात आरोपीने भक्तीचा खून केला. नंतर मृतदेह निर्जन ठिकाणी टाकले.

पोलिसांना भक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त होताच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रयत्नानंतर तिचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणात प्रियकर दुर्वास दर्शन पाटील याच्यासह विश्वास विजय पवार आणि सुशांत शांताराम नरळकर या दोघांना देखील संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे तिघेही रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमप्रकरणातून तरूणीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेतो बोलल्यानंतर हा बाप फिरकलाच नाही; नाशिकमधून राज ठाकरे फडणवीसांवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: भाजप पक्षाला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागतात - राज ठाकरे

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

SCROLL FOR NEXT