मोठी बातमी! शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिली माहिती

Sharad Pawar to meet Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. शरद पवार मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची शक्यता.
Sharad Pawar Likely to Meet Manoj Jarange Patil
Sharad Pawar Likely to Meet Manoj Jarange PatilSaam tv news
Published On
Summary
  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत.

  • आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, त्यांची प्रकृती ढासळल्याची माहिती आहे.

  • राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी शनिवारी रात्री त्यांची भेट घेतली.

  • शरद पवार मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची शक्यता.

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलकांनी कंबर कसली आहे. आझाद मैदानात उतरले असून, आज मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा तिसरा दिवस. बड्या नेत्यांसह अनेकांनी त्यांची भेट घेतली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाऊ शकतात, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सध्या शरद पवार उरळी कांचन येथे उपस्थित आहेत. ते सांयकाळच्या सुमारास मुंबईत दाखल होतील. तेव्हा आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील, अशी माहिती आहे.

काल रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाऊ शकतात, अशी माहिती आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. शनिवारी रात्री या भेटीगाठी घडल्या. राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात ४० सेकंद चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

Sharad Pawar Likely to Meet Manoj Jarange Patil
महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिसऱ्या मजल्यावरुन उडी, तपासात आत्महत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजेश टोपे यांनी माहिती दिली. शरद पवारांचा निरोप घेऊन राजेश टोपे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते, अशी माहिती आहे. यावेळी टोपे यांनी शरद पवार मुंबईत आल्यानंतर आझाद मैदानात जाऊन भेट घेतील, अशी माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar Likely to Meet Manoj Jarange Patil
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का! बड्या नेत्याची नाराजी उघड; थेट राजीनामाच दिला

वर्षावर खलबतं, २ तास चर्चा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. शनिवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. जवळपास १ ते २ तास चर्चा झाली असल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा आरक्षण यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यानंतर दोन्ही नेते खासगी गाडीनं वर्षा निवासस्थावरून बाहेर पडले. वर्षा बंगल्यावर नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर नाही. पण या चर्चेनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Sharad Pawar Likely to Meet Manoj Jarange Patil
धो-धो पावसात आभाळ फाटलं; घर जमीनदोस्त, जोडपं अन् ५ मुलं ढिगाऱ्याखाली अडकले, झोपेतच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com