Shivsena Worker Sanjay Kadam Die Saam Tv News
महाराष्ट्र

Ratnagiri News : पक्षाच्या प्रत्येक बैठकीत हजर, शिंदेंच्या खंद्या कार्यकर्त्याचं निधन; दोन लहान मुलांचं पितृछत्र अन् कुटुंबाचा आधार हरपला

Shivsena Worker Sanjay Kadam Die : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते असलेल्या बूथप्रमुखाचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांना निधन झालं आहे.

Prashant Patil

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते असलेल्या बूथप्रमुखाचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांना निधन झालं आहे. मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावचे शिवसेना बुथप्रमुख संजय कदम यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पक्षाच्या प्रत्येक बैठकीला हजर असणारा व शिवसेनेचे निष्ठेने काम करणारा खंदा कार्यकर्ता हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय कदम यांच्या या अचानक जाण्याने कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. तर दोन लहान मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय असलेले संजय कदम हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या गावची ग्रामपंचायतसुद्धा कायम शिवसेनेच्या ताब्यात राहावी यासाठी सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. इतकंच नाही तर अनेक नागरिकांची संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, शाळेचे दाखले काढणे यासाठी लोकांना मार्गदर्शन करत जमेल तसं कामही सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून ते करत होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दोन दिवसापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान दरम्यान गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते उत्तम इलेक्ट्रिशियन होते गावात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत वायरमन म्हणून त्यांची मोठी मदत ग्रामस्थांना होत होती.

संजय कदम हे महावितरणच्या एका ठेकेदार असलेल्या उपकंपनीत सेवेत होते. त्यामुळे वीज गेल्यानंतरही केवळ आपल्या भागाचा विचार न करता पणदेरी पंचक्रोशीत ते कोणत्याही वेळी मदतीला धावून जाणार व्यक्तिमत्व अशी त्यांची खास ओळख होती. बूथ प्रमुख म्हणून काम करत असताना मुंबईतील कार्यकर्त्यांची यादी त्यांना संपर्क करणे आदी पक्षाची काम ते निष्ठेने करत असत. पणदेरी परिसरातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे अशी माहिती शिवसेनेच्या मंडणगड तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT