ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१९ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. तर 20 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे.
जर तुम्हालाही दिवाळीला दिवाळी पहाटचा भाग बनायचा असेल तर मुंबईतील या दिवाळी पहाटांना नक्की भेट द्या.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सुरांच्या मैफीलीत दिवाळीचा उत्साह साजरा करु शकता. हा कार्यक्रम २० ऑक्टोबर २०२५ रोजी यशवंत नाट्य मंदिरात होणार आहे.
१९ ऑक्टोबर २०२५ रोजी, यशवंत नाट्य मंदिर येथे, दिवाळी पहाट नावाचा एक संगीत कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रियंका बर्वे यांचा परफॉर्म करणार आहेत.
मुंबईकर आणि नवी मुंबईकर अभंग रिपोस्ट दिवाळी पहाटला भेट देऊ शकता. तुम्ही येथे भक्ती आणि सांस्कृतिक लोकगीतांचा आनंद घेऊ शकता.
राहुल देशपांडे यांचा कलेक्टिव्ह दिवाळी पहाट १८ ऑक्टोबर २०२५ रोजी होत आहे. भक्ती, सांस्कृतिक तसेच रेट्रो गाण्यांच्या मैफीलीचा आनंद घेण्यासाठी येथे नक्की जा.
लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्या अकॅडमीमध्ये दिवाळी पहाट विशेष सकाळचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरेश वाडकर यांच्या सांताक्रूझ येथील अजीवसन संगीत अकॅडमीमध्ये होणार आहे.