Bee Attack on Ajit Pawar Rally Saam Tv News
महाराष्ट्र

VIDEO : कार्यकर्ते पळाले; कोणी गमछा भिरकवला तर कुणी झाडू उगारला, अजित दादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला

Bee Attack on Ajit Pawar Rally : मधमांशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली, काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरणे वापलरल्याचं दिसून आलं.

Prashant Patil

रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला झाल्याने एकच धांदल उडाली. संगमेश्वर येथे मशमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अजित पवारांच्या ताफ्यातील अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावले. संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला.

मधमांशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली, काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरणे वापलरल्याचं दिसून आलं. मधमांशांचा घोंगाट उठताच गाडीत बसण्यासाठी सर्वांची एकच धावपळ झाली होती. काहींनी हाताने मधमाशांना झटकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मधमाशांच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून त्यात मधमाशाही पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूचक विधान केलंय. '१५ वर्ष काँग्रेसबरोबर काम करत असताना आपण लोकसभा, विधानसभा एकत्रित लढवायचो. पण बाकीच्या निवडणूका जिल्ह्याचे नेतेगण ठरवायचे, काय केलं पाहिजे? तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहोत. सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्यामुळे तुमचा गैरसमज करून घेऊ नका,' कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे विधान केलंय

'अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात, की या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, त्यांची गरज आता संपली आहे, गरज सरो वैद्य मरो, अशा चर्चा करत असतात. मी असं करणार नाही, राष्ट्रवादी पक्षाची ती भूमिका नाही. संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही. मुख्यमंत्री किंवा शिंदे साहेबांची ती भूमिका नाही.'

'आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आणि रक्षाबंधनाची भेट आहे. त्यामुळे ही योजना चालूच राहील. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशांकरिता ही योजना आहे. एका योजनेचा लाभ मिळत असेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही', असंही अजित पवार यांनी स्पष्ट यावेळी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT