Ratnagiri Rainfall Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri Rain Video: रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, खेड शहरातील गांधी चौकात पूर सदृश्य परिस्थिती

Priya More

अमोल कलये, रत्नागिरी

रत्नागिरीला मुसळधार पावसाने (Ratnagiri Rainfall) झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी झाले आहे. गटारे तुंबल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. खेड शहरातील गांधी चौकात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपालिका अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याला २१ जुनपर्यंत हवामान खात्याकडून आँरेंज अलर्ट जारी केलाय. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस होतोय. मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे प्रशासनाची पोलखोल समोर आलीय. या पावसामुळे खेड बाजारपेठेतील गटारं तुडूंब भरली.

खेड शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक या ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे संपूर्ण पाण्याचा लोंढा हा दुकानांमध्ये शिरला. तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काही काळ खेड शहरातील गांधी चौक या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली.

रत्नागिरीमध्ये अजून म्हणावा तसा पाऊस सुरु झालेला नाही. मात्र या सुरुवातीच्या पावसातच खेड नगरपालिकेने केलेल्या कामांबाबत शाशंकता निर्माण झालीय. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीच्या कामांबाबत संताप व्यक्त केलाय. दरम्यान, रत्नागिरीमध्ये पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : 'भारत हे हिंदू राष्ट्र..' सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

VIDEO : जुन्नरचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला; बघा काय केली मागणी

Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

Beed News : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ट्रॅव्हल्स चालकाचा गळफास; मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT