Vinayak Raut, Narayan Rane  saam tv
महाराष्ट्र

'Narayan Rane भुंकण्याचा काम करताे, शिव्या घालण्याशिवाय बाकी काही काम नाही'

हा देश हुकुमशाही पद्धतीने चालविला जात आहे अशी टीका खासदार राऊतांनी नरेंद्र माेदी आणि अमित शहा यांच्यावर केली.

अमोल कलये

Narayan Rane News : महाराष्ट्राचे सरकार औट घटकेचे राहिले आहे. या सरकारचा लवकरच पाणउतारा हाेईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला. दरम्यान नारायण राणे यांना दुस-यांना शिव्या घालण्यापेक्षा काही येत नाही अशी टीका खासदार राऊत यांनी नारायण राणेंवर केली.

(Maharashtra News)

खासदार विनायक राऊत म्हणाले सामना वाचल्याशिवाय देशाचे राजकारण चालत नाही. हे सर्वांना माहित आहे. नारायण राणेंची कुल्हेकुई गेली अनेक वर्ष सुरु आहे. काही वर्षांपुर्वी नारायणे राणेंनी नरेंद्र माेदी यांना अरे तुरे केले, त्यांचे वाभाडे काढले हाेते. त्यांची भकवासगिरी आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आहे.

साेनिया गांधी (sonia gandhi), उद्धव ठाकरे (uddhav thackeray), अमित शहा (amit shah) यांना नारायण राणेंनी शिव्या घातल्या. नारायण राणेंनी आजपर्यंत भुंकण्याचे काम केले आहे. त्यांचे बाकी काही काम नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या पाठबळावर नरेंद्र माेदींपासून (narendra modi) आशिष शेलार (ashish shelar) यांचे नेतृत्व घडल्याचे खासदार विनायक राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले आत्ताचे महाराष्ट्राचे सरकार औट घटकेचे राहिले आहे.

आगामी काळात सर्वाच्च न्यायालयाचा निकाल येईल. त्यानंतर राजकाराणाची दिशा बदलेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले हऩुमंताने नारायण राणेंना सुबुद्धी द्यावी. पुढचा मार्ग कसा चालावा याची दिशा हनुमंताकडून त्यांनी घ्यावी असेही राऊतांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मुंबईच्या दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT