Mla Yogesh Kadam News : हर्णे बंदराचा कायापालट होणार, 221 कोटींचा निधी मंजूर : आमदार याेगेश कदम

दापोली येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषद आमदार कदम बाेलत हाेते.
Mla Yogesh Kadam, Dapoli, Harne Bandar
Mla Yogesh Kadam, Dapoli, Harne Bandarsaam tv
Published On

- जितेश कोळी

Harne Bandar News : कोकणातील सर्वात मोठे बंदर असलेल्या हर्णे बंदराच्या (harne port) विकासासाठीच्या 221 कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रस्तावाला मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत् पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार योगेश कदम (mla yogesh kadam) यांनी दिली. दापोली येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषद आमदार कदम बाेलत हाेते.

Mla Yogesh Kadam, Dapoli, Harne Bandar
Sangli Covid-19 Update : कारागृहात काेराेनाचा शिरकाव, सांगली पाेलिसांचे धाबे दणाणले

आमदार याेगेश कदम म्हणाले या बैठकीत मतदार संघातील कोळी बांधवांना मत्स्य व्यवसायासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या तसेच एलईडी (LED) कायद्याची अंमलबजावणी करणे, हर्णे बंदराजवळ आईस फॅक्टरी होणे, पर्यटन जेट्टी उभारणे, मच्छी ओटे व लहान जेट्टीसाठी निधी उपलब्ध करणे, फिशरीज कर्मचारी भरती करणे, मत्स्य व्यावसायिकांना कर्ज माफ करणे अशा विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

Mla Yogesh Kadam, Dapoli, Harne Bandar
Konkan Tourism : काेकणातील पर्यटनासाठी 'हाऊसबाेट' ची संकल्पना; गुहागरच्या युवकाची कल्पकता (पाहा व्हिडिओ)

या बैठकीत हर्णे बंदराच्या विकासासाठी 221 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. येत्या 15 दिवसात निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.

हर्णे बंदरावर मच्छिमारांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात येणार आहे. विदेशी पर्यटकांच्या बोटी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर थांबाव्यात यासाठी येथे पार्किंगची व्यवस्था देखील केली जाणार आहे. यामुळे कोकणातील हर्णे बंदराचे नाव जगभरात ओळखले जाईल असा विश्वास देखील आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com