MNS banner  saam Tv
महाराष्ट्र

'गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा'; मनसेकडून सेनेच्या समर्थनात बॅनरबाजी, चर्चांना उधाण

राज्यातील राजकीय घडामोडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. रत्नागिरीत 'गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा' अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहे.

अमोल कलये

अमोल कलये

रत्नागिरी : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट अशी उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शासकीय निवास्थान वर्षा काही दिवसांपूर्वी सोडले. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना गहिवरून आलं होतं. त्यानंतर ठाकरे कुटुंबाचा राजकीय अस्त होणार का,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. याचदरम्यान, या राजकीय घडामोडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. रत्नागिरीत 'गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा' अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहे. सेनेचे समर्थन मनसेकडून केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ( Maharashtra Political crisis News In Marathi )

राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सेना विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे सेनेचा बुरुज ढासळत चालला आहे, त्याला भक्कम साथ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे नाका परिसरात 'कोकणची भूमी निष्ठावंतांची गद्दारांना ठोका ठाकरे बँड वाजवा' अशा आशयाचे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आले आहेत.

सदर बॅनरवर बाजूला भगवी शाल परिधान केलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आहे. तर दुसर्‍या बाजूला मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांचा फोटो आहे. सदरच्या बॅनरवरून मनसे आता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार की काय असाच या बॅनरमधून संकेत मिळत आहेत. सदर बॅनरवरून खेडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला कोणाचा पाठिंबा हे जगजाहीर झालं,पण...; नितीन राऊतांना शंका

बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गटात उभी फूट पडली आहे. त्यामुळे महाविकास कोसळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'एकनाथ शिंदे हे जे शक्तिप्रदर्शन करीत आहेत, ते कोणाच्या इशार्‍यावर करीत आहेत आणि कुणाचा पाठिंबा त्यांना आहे हे जग जाहीर झालं आहे.आता पडद्यामागे जो कोणी आहे, त्या पडद्यामागच्या व्यक्तीला शोधणे हे महत्त्वाचं आहे, असे मत उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT