Parshuram Ghat Traffic Jam Saam Tv
महाराष्ट्र

Parshuram Ghat: परशुराम घाटात कंटेनरला अपघात, दोन्ही मार्गिका बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Parshuram Ghat Traffic Jam: परशुराम घाटामध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी यापूर्वीच बंद होती. आता दोन्ही मार्गिका बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Priya More

रत्नागिरीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनरला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परशुराम घाटामध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी यापूर्वीच बंद होती. या अपघातामुळे सध्या परशुराम घाटात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम घाटातील एका लाईनवरती अरुंद रस्त्यामुळे ट्रकचा अपघात झाल्यामुळे एक लाईन पूर्णपण बंद झाली आहे. तर दुसरी लाईन रस्ता क्रॅक झाल्यामुळे गेल्या १५ दिवसापासून बंद आहे. यामुळे सध्या परशुराम घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एकाच ठिकाणी अडकून राहिलयामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT