Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : चिपळूणमध्ये परतीच्या पावसाचे थैमान; वीज पडून तरुणाचा मृत्यू, ६ जण जखमी

Ratnagiri Chiplun News : हवामान विभागाकडून राज्यात १५ व १६ ऑक्टोम्बरपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. परतीचा पाऊस असणार आहे. त्यानुसार बुधवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली

Rajesh Sonwane

अमोल कलये  

रत्नागिरी : राज्यातील अनेक भागात बुधवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यानुसार चिपळूण तालुक्यात देखील वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान तालुक्यातील मूर्तवडे येथे वादळी पावसात वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू आहे. तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

साधारण महिनाभर राज्यात जोरदार पावसाने थैमान घातले होते. यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागाकडून राज्यात १५ व १६ ऑक्टोम्बरपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हा पाऊस परतीचा असणार आहे. त्यानुसार बुधवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह चिपळूण तालुक्यात पावसाचे धुमशान पाहण्यास मिळाले. 

वीज कोसळून एकाचा मृत्यू 
दरम्यान चिपळूण तालुक्यात जोरदार पावसाला सुरवात झाल्यानंतर धावपळ उडाली होती. यात मूर्तवाडे शिवारात शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली. यात सुशील पवार (वय ४१) याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण थोडक्यात बचावले असून ते जखमी झाले आहेत. जखमी लोकांना उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी 

जुन्नर तालुक्यातील ओतुर परिसरात रात्री ढगांचा गडगडाटसह अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी जुन्नर तालुक्यातील ओतुर बाजार समिती परिसरात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला, कांदा आणि तरकारी माल पावसात पूर्णपणे भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. कांद्याला बाजारभाव नसताना आता पावसाच्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची भरपाईची आशा धुसर झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करताना काय काळजी घ्याल?

SCROLL FOR NEXT