Maharashtra Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Ratnagiri News: गोवंश हत्येप्रकरणी मोर्चा अन् रास्ता रोको; भाजप नेते निलेश राणेंसह ४५० जणांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Breaking News: काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी येथे संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडले आणि रत्नागिरीत खळबळ उडाली. या प्रकारानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले होते. हा

अमोल कलये

रत्नागिरी, ता. ११ जुलै २०२४

रविवारी गोहत्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाकडून रत्नागिरीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा प्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांच्यासह ४५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी येथे संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडले आणि रत्नागिरीत खळबळ उडाली. या प्रकारानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले होते. हा रत्नागिरीतील हा सगळा प्रकार थांबला पाहिजे नाहीतर गो रक्षणासाठी कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा देत निलेश राणे यांनी निषेध मोर्चा काढला होता.

रविवार (ता. ७, जुलै) रोजी रत्नागिरी शहरामध्ये सकल हिंदू समजाकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. गो वंश हत्या थांबवावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी रत्नागिरीत हा मोर्चा निघाला होता. विविध हिंदूत्ववादी संघटनांंसह माजी खासदार निलेश राणेही मोर्चात सहभागी झाले होते.

याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून निलेश राणे यांच्यासह 450 जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 31 (1) अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT