Dapoli Accident News Saamtv
महाराष्ट्र

Ratnagiri Accident News: मोठी दुर्घटना! दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी..

Dapoli Accident News: रत्नागिरी दापोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दापोलीतील आसूद जोशी आळी इथे ट्रक आणि वडाप गाडीमध्ये भयंकर अपघात झाला असून या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी - दापोलीतील आसूद जोशी आळी येथे दोन वाहनांमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि खासगी प्रवासी वाहनामध्ये हा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

मरियम गौफिक काझी (६ वर्षे) स्वरा संदेश कदम (८ वर्षे) संदेश कदम, (५५ वर्ष) अनिल सारंग (४५ वर्षं) फराह तौफिक काझी (२७ वर्ष) मिरा महेश बोरकर (२२,वर्ष) वंदना चोगले (३८) आणि समिया इरफान शिरगावकर अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. आज (२५, जून) दुपारी 3.30 सुमारास हा भीषण अपघात झाला.

ही धडक इतकी भयंकर होती की दोन्हीही गाड्यांचा यामध्ये अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातातील 5 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील काहींना मुंबईला हलवण्यात आले आहे. विनायक हशा चौगुले- ( वय,४५) श्रध्दा संदेश कदम (वय,१४) ,भुमी सावंत (वय, १७), मुग्धा सावंत (वय,१४) ज्योती चोगले (वय, ०९) अशी जखमींची नावे आहेत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT