Ratnagiri News saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

Ratnagiri News : रत्नागिरीमधील कुणबी समाजाचे नेते सुनील नावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सकाळी ते एका आंदोलनात सामील झाले होते. घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

Yash Shirke

  • कुणबी समाज नेते सुनील नावले यांचे निधन झाले.

  • सकाळी मोर्चात सहभागी झाल्यानंतर ते घरी परतले होते.

  • घरी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

अमोल कलये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Heart Attack : रत्नागिरी जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते, पंचायत समिती माजी उपसभापती आणि संजय गांधी निराधार योजना रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील नावले यांचे सोमवारी (१५ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात निघालेल्या मोर्चामध्ये ते सामील झाले होते. आंदोलनाहून परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात सुनील नावले यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कुणबी समाजेन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सुनील नावले (वय ५४ वर्षे) हे सहभागी झाले होते. आंदोलन आटोपून ते रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी गेले. दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

तपासणीसाठी रुग्णालयात जात असताना रिक्षात सुनील नावले यांची अवस्था आणखी बिघडली. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यान सुनील नावले यांची प्राणज्योत मालवली. ही माहिती मिळताच त्यांच्या समाजातील पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सकाळी आंदोलनात साथ असलेल्या नेत्याचे दुपारी निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सुनील नावले यांनी रत्नागिरी पंचायत समिती उपसभापतीपद भूषवले होते. पालकमंत्री उदय सामंत यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते परिचित होते. कुणबी समाज संघटनांसह विविध सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. राजकीय क्षेत्रात ते क्रियाशील होते. संजय गांधी निराधार या योजनेसाठी रत्नागिरी तालुक्याच्या समितीवर पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार व जिल्हाअधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने त्यांची २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या पहिल्या सभेत त्यांनी एकूण १८३ अर्जांना मंजुरी दिली होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गरजू व्यक्तींना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले होते. एक आंबा बागायतदार म्हणूनही त्यांची ख्याती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : हाय मेरी परम सुंदरी, सई ताम्हणकरचा लेटेस्ट लूक

Pandharpur Rain : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी-वीर धरणातून मोठा विसर्ग | VIDEO

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Navratri 2025: नवरात्रीत करा नारळाचा सोपा उपाय, होईल फायदा

Saptashrungi Gad : सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत गडावर खासगी वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT