राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे दुर्घटना
खाडीत मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेली पाच मुले खोल पाण्यात बुडाली
या घटनेत एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील नागार इंगळवाडी येथील एका खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू झालाय. खाडीमध्ये मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील पाच मुले खोल पाण्यात बु़डाली, यापैकी एका लहान मुलीला वाचवण्यात यश आलं पंरतु या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले आई-वडिलांसोबत कालवे काढण्यासाठी गेलेली होती. जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या मुलांसह आज खाडीत मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यात बुडाली. त्यातील एका मुलीला वाचवण्यात आले; मात्र इतर चार भावंडांचा दुर्दैवी अंत झाला.यात मोहम्मद जुनेद भाटकर , जुहेरिया जुनेद भाटकर , बुशिरा जुनेद भाटकर , माहिरा जुनेद भाटकर यांचा मृत्यू झालाय. खाडीतील पाणीचा अंदाज न आल्यानं पाच मुले खोल पाण्यात बुडाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थली धाव घेतली. एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाल्यानं स्थानिक नागरिकांनाही मोठा धक्का बसलाय. कुटुंबातील मुलांच्या मृत्यूमुळे भाटकर कुटुंबावर दु: खाचा डोंगरस कोसळला आहे.
दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू
ऑक्टोर महिन्याच्या सुरुवातीला रायगडमध्ये आठ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी ही दुर्घटना घडली होती. पुण्यातील आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे फिरण्यासाठी आली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ८ जण समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.