Ganpatipule Five Tourists Drowned In Sea saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : बाप्पाचे दर्शन घेतले, नंतर बीचवर फिरायला गेले; काही क्षणांत अनर्थ घडला; समुद्रात बुडालेल्या ५ तरुणांची नावं आली समोर

Ganpatipule Five Tourists Drowned In Sea: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे छत्रपती संभाजीनगरमधील पाच पर्यटकांचा समुद्रात बुडाल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी इतर तिघांना वाचवले.

Bharat Jadhav

  • रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली.

  • छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या पर्यटकांपैकी पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.

  • आठ तरुण समुद्रात उतरले होते, त्यापैकी तीन जणांना स्थानिकांनी वाचवले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे मोठी दुर्घटना घडली. समुद्रात पोहोयला गेलेले पाच जण बुडाले. समुद्रात बुडालेल्यांची नावे समोर आली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरातील ११ जणांचा एक पर्यटक ग्रुप फिरायला रत्नागिरी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक समुद्र किनारी पोहचले. त्यावेळी आठ तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. यातील तीन मुलांना स्थानिकांनी वाचवले मात्र, पाच तरुण बुडाले.

बुडाल्यांची नावे

आदित्य संतोष राऊत - वय २२

अनिकेत बंडू हिरावळे - वय २०

आनंद राजू नरजवडे - वय २०

प्रेम दिपक आदमाने - वय १९

यश रामेश्वर कांबळे - वय १९

रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील पर्यटनस्थळी अनेक जण उन्हाळ्यात फिरायला जातात. दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील ११ जण या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. गणरायाच्या दर्शनानंतर आठ तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र समुद्रातील लाटांचा अंदाज न आल्याने ही मुले बुडू लागली.

समुद्रकिनाऱ्यावरील मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी त्यांच्या मदतीसाठी समुद्रात उड्या घेतल्या. यातील तीन मुलांना स्थानिकांनी वाचवलं, मात्र पाच मुले बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. लाईफ गार्ड आणि स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात धाव घेतली. मच्छीमारांची टीम या मुलांचा शोध घेत आहे. परंतू वारा आणि समुद्रात तुफान वारे असल्याने मदतकार्यात अडथळे आणत आहे.

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोन विद्यार्थी बुडाले

काही दिवसापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे समुद्रकिनाऱ्यावर दोन विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली होती. हे दोघेही कोल्हापूरहून सहलीसाठी आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे होतं. तर मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) अशी वाचवण्यात आलेल्या मुलाचे नाव होतं.

हे दोघे कोल्हापूर येथील एका खासगी क्लासमधील ४१ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. अतुल सुतार हा समुद्रात अधिक खोलवर गेला. त्याला परत आणण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे त्याच्या मागे गेला. मात्र समुद्रातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उभे राहून पाणी का पिऊ नये? शरीरात होणारे 5 गंभीर परिणाम जाणून घ्या

Online shopping dispute: इन्स्टाग्रामवरून ड्रेस मागवला, पण डिलिव्हरीच झाली नाही; महिला थेट कोर्टात गेली, बुटीकला थेट दंड

Railway Accident : मोठी दुर्घटना टळली! धावत्या विरार-भरूच मेमू ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरलं

Maharashtra News Live Update: नागपुरात सकाळपासून आभाळ असून शहरातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT