Cyber Crime
Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: मेडीकल कोर्सला प्रवेश देण्याची बतावणी; 15 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. खोटी कारण देऊन ऑनलाइन पद्धतीने आर्थिक (Fraud) फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी (ratnagiri) येथे घडला. मेडिकल कोर्सला प्रवेश मिळवून देतो असे सांगत चक्क १५ लाख १० हजार रुपयांना चुना लावत फसवणूक (Cyber Crime) केली आहे. याप्रकरणी महेश विठ्ठल अदाते (42, रा.कसपटे वस्ती, ता.वाकड जि.पूणे) या संशयित इसमाला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Letest Marathi News)

वैद्यकिय कोर्समध्ये प्रवेश करुन देण्याचे आमिष दाखवत डॉक्टराकडून (Doctor) ऑनलाईन पध्दतीने सुमारे 15 लाख 10 हजार रुपये घेउन फसवणूक केली. या प्रकरणातील संशयिताला रत्नागिरी शहर पोलिसांनी (Police) अटक केली असून बुधवारी त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या विरोधात डॉ. अमोल वासुदेव झोपे (वय 39, रा.पर्णिका एंपायर आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

जून 2019 ते 10 मे 2022 या कालावधीत महेश अदाते याने त्यांना 'डिप्लोमा इन डर्माटोलॉजी अ‍ॅन्ड वेनेरिऑलॉजी' या कोर्सचे प्रवेश करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या बँक खात्यावर आरटीजीएस, आयएमपीएस व गुगल पे व्दारे 12 लाख 60 हजार रुपये जमा करुन घेतले. तसेच आपल्या वडिलांच्या खात्यावर 2 लाख 50 हजार असे एकूण 15 लाख 10 हजार रुपये घेतले. परंतु पैसे घेउनही वैद्यकिय कोर्समध्ये प्रवेश मिळवून न देता डॉ. झोपे यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात 10 मे 2022 रोजी तक्रार दिली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांनी तपास करुन संशयित महेश अदातेला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Special Report : Ravindra Dhangekar | 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'?

Special Report : Prakash Ambedkar | 'ठाकरे-शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार' आंबेडकरांचा मोठा दावा

Special Report : Praful Patel | पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Special Report : Raj Thackeray | राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर?

SCROLL FOR NEXT