Ratnagiri Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri Crime News: पैशांच्या मागणीला प्रियकर कंटाळला; प्रेयसीला जंगलात नेलं अन् कायमचा विषय संपवला, ३ महिन्यांनी हत्येचा उलगडा

Crime News: महिलेचे आणि आरोपीचे एकमेकांवर प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यात वाद सुरू होता.

Ruchika Jadhav

Ratnagiri News:

रत्नागिरीतील लांजा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून प्रियकराने तिची हत्या केलीये. जुलै महिन्यात आरोपीने हत्येचा कट रचला होता. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पोलीस तपासाला आता यश आलं आहे. आरोपी प्रियकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंड्ये येथील वैशाली (वय ४८) असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपीने मोठ्या शिताफीने संपूर्ण हत्येचा कट रचला होता. महिलेचे आणि आरोपीचे एकमेकांवर प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. २८ जुलैला या दोघांचे कॉलवर तसभर बोलणे झाल्याचे पोलिसांना तपासात समजले होते.

पुढे २९ जुलै रोजी महिला मी दवाखाण्यात जाते असे सांगून घराबारे पडली होती. मात्र ती दवाखाण्यात न जाता प्रियकराला भेटली. प्रियकराला भेटल्यानंतर तिने पैशांची मागणी केली. या मगणीला कंटाळून प्रियकराने तिला जंगल परिसरात नेले आणि तिची हत्या केली.

घटनेता तपास सुरू असताना आरोपी खरं सांगण्यास आणि आपला गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हता. अखेर गावातील एका व्यक्तीने पोलिसांना आरोपी आणि गायब असलेली विवाहीत महिला जंगलाच्या दिशेने गेले होते असं सांगितलं. पोलिसांनी पुन्हा एकदा तपास केला असता जंगलात महिलेच्या काही वस्तू सापडल्या. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

मृत महिला बेपत्ता झाल्यानंतर ती घरी न आल्याने तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच राजेंद्रवर देखील महिलेच्या पतीनेच संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पुढे तीन महिन्यांनी या घटनेचा उलगडा झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Varvarche Vadhu Var: लग्नाआधी एकदा पाहाचं ! लग्नावरचं हलकं फुलकं, प्रभावी नाटक - 'वरवरचे वधू वर'

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

SCROLL FOR NEXT