Ration shop Saam tv
महाराष्ट्र

Ration Shop : मृतांच्या नावानं रेशनची चोरी, कोण खातंय मृतांच्या टाळूवरचं रेशन?

Ration Shop : रेशनचे अनेक घोटाळे आपण ऐकले आणि पाहिले असतील. मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं रेशन खाण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ल्ह्यात समोर आलाय.

Girish Nikam

Ration Shop : रेशन दुकानदारांचा काळा धंदा राज्याला नवा नाही. मात्र भंडारा जिल्ह्यातील गराडा गावातील प्रकार संतापजनक आहे. रेशन दुकानदारच मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खात असल्याचा प्रकार घडत आहे. रेशन दुकानदाराची ही बनवाबनवी महिला सरपंचानं उघड केली आहे.

रेशनचे अनेक घोटाळे आपण ऐकले आणि पाहिले असतील. मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं रेशन खाण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ल्ह्यात समोर आलाय. भंडारा तालुक्यातल्या गराडा खुर्द गावातील गेल्या अनेक वर्षांपासून मृत व्यक्तीच्या नावाने रेशन लाटलं जातंय. गराडा येथील अनेक नागरीक मृत झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद झालं. मात्र तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदाराला संबंधित मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिलं जातंय. खुद्द महिला सरपंचांच्या सासूच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. सरपंच सविता टीचकुले यांनी ऑनलाईन तपासणी केल्यावर हा गैरकारभार समोर आला. एवढंच नव्हे तर त्यांच्यासारख्या 25 कुटुंबांच्या बाबतीत हा गंभीर प्रकार घडल्याचं उघड झालंय.

सरकारला चुना लावण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे हे मृतांच्या टाळूवरचं रेशन केवळ दुकानदार लाटतोय की पुरवठा खात्यातले बडे धेंडही यात सहभागी आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.

त्यामुळे साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत.

मृत व्यक्तीचं नाव रेकॉर्डवरुन का काढलं नाही? केवळ एकाच गावात सुरू आहे की पूर्ण तालुक्यात? रेशन दुकानांची, रेकॉर्डची नियमित तपासणी होत नाही? बाहेरगावच्या लोकांचे रेशनकार्ड कोणी तयार केले? दुकानदाराचे तहसील कार्यालयातील कुणाशी साटंलोटं? यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तक्रारीनंतर प्रशासनाला जाग आली. भंडाऱ्यातील तालुका पुरवठा अधिकारी सत्यम बांते यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे. खरंतर असे बोगस रेशन कार्ड तयार होत असताना तहसिलदार, तालुका पुरवठा विभाग काय करत होते ? हाच खरा सवाल आहे. अनेक ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचं अंत्योदय योजनेचं धान्य मिळत नाही.मात्र भ्रष्ट रेशन दुकानदार आणि पुरवठा खात्यातले घोटाळेबाज अधिकारी गरिबांच्या धान्यावर डल्ला मारतात. त्यामुळे या रेशनचोरांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT