कुंडलिका नदीवरील पूल बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन Saam Tv
महाराष्ट्र

कुंडलिका नदीवरील पूल बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन

या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना- रोहणवाडी Rohanvadi रस्त्यावरील कुंडलिका नदीवर Kundalika river लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज जालन्याजवळील Jalna रोहणवाडी पुलावर नदीच्या पाण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कुंडलिका नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी आंदोलन करण्यात आली.

हे देखील पहा -

आंदोलना दरम्यान पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर जालना - रोहणवाडी रस्त्यावरील या पुलावरून सातत्याने वाहतूक बंद करावी लागते.सध्याही कुंडलिका नदीवरील या पुलावरुन पाणी वाहत असल्याने नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा खोळंबा होतो. पण या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने पुलांचं काम रखडल आहे.

दरम्यान, या आंदोलनावेळी एक दुचाकी चालक पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाताना दुचाकीसह वाहून जात होता. पोलीस, आंदोलक आणि नागरिकांनी धावत जाऊन या दुचाकीचालकाला पकडले त्यामुळे वाहून जाता-जाता तो वाचला. दरम्यान पुलाचे काम न केल्यास कुंडलिका नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT